उन्हाळी सुट्यांसाठी चिपळूण डेपोतून जादा गाड्या
दिनांक १४ एप्रिल २०२३ पासुन चिपळूण विभागातुन मुंबईसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत . या मध्ये साधी बस आणि नॉन एसी स्लीपर सीटर या बसेस चा समावेश आहे . चिपळूण डेपोमधून चिपळूण -कल्याण , चिपळूण – भांडुप , तळवडे – चिपळूण -भांडुप आणि चिपळूण –पनवेल या बस चा समावेश आहे .
जादा वाहतुकीचा फायदा कोकणातील सर्व गावांना होणार आहे त्यामध्ये खेड , पोलादपूर , महाड, माणगाव ,इंदापूर , कोलाड , पेण ही गावे आहेत .
आरक्षणासाठी प्रवाशांनी ऑनलाईन किंवा बस स्थानकाचा पर्याय निवडावा . ऑनलाईन आरक्षण https://public.msrtcors.com/ticket_booking/ या वेबसाइट उपलब्ध आहे .
महिलांसाठी ५०% आरक्षण असणार आहे आणि ७५ वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवास असणार आहे . तरी सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा .
उन्हाळी सुट्यांसाठी चिपळूण डेपोतून जादा गाड्या
मार्ग : खेड , पोलादपूर , महाड , माणगाव , इंदापूर , कोलाड , नागोठणे , पेण रामवाडी पनवेल , डोंबिवली
वेळ : चिपळूण ते कल्याण ८:३०, २०:१५ / कल्याण ते चिपळूण ६:३०, २०:१५
मार्ग : खेड , पोलादपूर , महाड , माणगाव , इंदापूर , कोलाड , नागोठणे , पेण रामवाडी पनवेल , बेलापूर , ऐरोली , ठाणे CBS , मुलुंड चेक नाका
वेळ : चिपळूण ते भांडुप २०:४५ / भांडुप ते चिपळूण ६:३०
मार्ग : भरणा नाका , पोलादपूर , महाड , माणगाव , इंदापूर , कोलाड , नागोठणे , पेण रामवाडी
वेळ : चिपळूण ते पनवेल सकाळी ९:०० वाजता / पनवेल ते चिपळूण संध्याकाळी ५:०० वाजता
मार्ग : गोवळ , पाते , तळवडे , कुटरे , सावर्डे , खेड , पोलादपूर , महाड , माणगाव , इंदापूर , कोलाड , नागोठणे , पेण रामवाडी पनवेल , कामोठे , बेलापूर , घणसोली , ऐरोली , ठाणे CBS , मुलुंड चेक नाका
वेळ : तळवडे चिपळूण ते भांडुप सकाळी ७:३० / भांडुप ते चिपळूण तळवडे रात्री ९:३०