यशवंत नगरीतील प्रवाशांच्या मागणीनुसार दिनांक २१ डिसेंबर २०२३ पासून सटाणा ते कोल्हापूर अशी MSRTC बसची सेवा सुरु करण्यात आली आहे . या बसमुळे स्थानिक रहिवाश्याना थेट कोल्हापूर ला जात येणार आहे . सदर बस नाशिक, पुणे मार्गे जाणार आहे .
सदर बस सटाणा वरून सकाळी ५:०० वाजता निघेल आणि कोल्हापूर ला संध्याकाळी ७:०० पर्यंत पोचेल . तसेच कोल्हापूर वरून सकाळी ६:०० वाजता निघेल आणि संध्याकाळी ८:०० पर्यंत सटाण्याला पोचेल .
सटाणा ते कोल्हापूर ह्या बसचे आगाऊ तिकीट बुकिंग एसटी बसच्या वेबसाइट वरून करू शकता .
या बस सेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाश्यांची घ्यावा हि विनंती . बसचे तिकीट दर , थांबे या बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
सटाणा ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते सटाणा तिकीट दर रुपये.७९० आहे . महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत आहे त्यामुळे त्यांना ३९५ रुपये तिकीट असणार आहे . ७५ वर्षांवरील म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात १००% सवलत आहे .
Satana to Kolhapur Bus Stops
Satana to Kolhapur या बसेसचे थांबे पुढील प्रमाणे आहेत