महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ खेड आगारातर्फे दिनांक २ व ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ५ वाजता श्री अष्टविनायक दर्शन करीत एसटी बस सोडण्यात येणार आहे . या प्रवासासाठी २८०० रुपये प्रवासी भाडे आहे.
खेड वरून अष्टविनायक दर्शन बसचा मार्ग
खेड वरून बस २ फेब्रुवारी ला सकाळी ५ वाजता निघेल आणि पाली, महड , लेण्याद्री , ओझर या ठिकाणी देवदर्शन करून ओझर ला एक मुक्काम करेल . ३ फेब्रुवारी ला रांजणगाव , थेऊर , सिद्धटेक , मोरगाव आणि रात्री पर्यंत खेड ला पोचेल .
यात्रेमधील समाविष्ट बाबी
सकाळी चहा नाश्ता , दुपारचे व रात्रीचे जेवण आणि संध्याकाळी चहा